anna पद्मभूषण क्रांतिवीर
डॉ.नागनाथअण्णा नायकवडी Padmabhushan Krantiveer Dr. Nagnathanna Nayakawadi


पुर्ण नांव
नागनाथ रामचंद्र नायकवडी
जन्म दिनांक
१५-०७-१९२२
शिक्षण
मॅट्रीक
१९३०
क्रांतीसिह नाना पाटील यांचे सभांना उपस्थिती
१९३९,मे
कर्मवीर भाऊराव पाटील यांची भेट. शिराळ्यांतील दुर्गम भागांत व्हालंटरी शाळा सुरु
१९४०
पहीली विद्यार्थी परीषद, कामेरी
  १९४२, ऑगष्ट
कॉग्रेस अघिवेशनासाठी उपस्थिती
१९४३, ऑगष्ट
प्रतीसरकारची स्थापणा (पणुब्रे), क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नेतृत्वाखाली कार्यकारी मंडळाचे सद्स्य
१९४३, ऑक्टोबर
सांगाव ता. कागल जि. कोल्हापूर पोलीस चौकीतून यशस्वीपणे बंदुका पळविल्या
१९४४, एप्रिल १४
धुळे खजिना लुटीत सहभाग
१९४४, जुलै २९
देशद्रोही लोकांनी फितुरी केल्यानं वाळव्यात अटक, इस्लांपूर तुरुंगात रवाणगी, पुढे सातारा मघ्यवर्ती तुरुंगात रवाणगी.
१९४६, फेब्रुवारी २५
सोनवडे आणि मणदुर गावांतील ओढ्यात ब्रिटीश पोलिसांसोबत सशस्त्र चकमक. क्रांतिवीर किसन अहिर व नानकसिंग चकमकीत हुतात्मा झाले.
१९४६
एस.एम. जोशी यांच्याकडून समाजवादी पक्षांत येण्याचे आवाहन. राष्टीय नेते जयप्रकाश नारायण अण्णांना भेटण्यासाढी वाळव्यात आले. महार वतनातुन येणारी गुलामी संपविण्यासाठी आणि वतन मुक्ती लढा संघटित करण्यासाठी ८० गांवात समित्या स्थापन. संत गाडगे महाराजांचे अध्यक्षतेखाली सातारा येथे धननीच्या बागेत लोकवर्गणीतुन जमा केलेला एक लाख रुपयांचा निधी रयत शिक्षण संस्थेला सुपूर्द.
१९४८
स्वातंत्र्यानंतरही चळवळ सुरु ठेवण्याच्या निर्धाराचा मोरारजी देसाई सरकारला राग. किर्लोस्कर कंपणीसमोर सभेत अटक. सशस्त्र मोर्चामुळे अण्णांना तुरुंगातून सोडावे लागले.
१९४८
हुतात्मा स्मारक म्हणून वाळवा येथे किसान शिक्षण संस्था व हुतात्मा किसन अहिर विद्यालय, हुतात्मा नानकसिंग वस्तीगृह स्थापन. भारतीय कम्युनिस्ट पक्षात घेतल्याची तार व महाराष्ट्र कार्यकारीनीवर निवड
१९५०, फेब्रुवारी १३
सत्यशोधक पद्धतीने कोल्हापुर येथे कुसुमताईंशी विवाह
१९५२
कामगार किसान पक्ष आणि डावा समाजवादी पक्ष यांच्या आघाडीतर्फे विधानसभा निवडणुकीत वाळवा मतदासंघातून उमेदवारी
१९५२
जुने खेड (ता.वाळवा) येथे लेव्हीविरुध्द आंदोलन
१९५६-५७
संयुक्त महाराष्ट्र चळवळीत पुढाकार
१९५७
संयुत्त महाराष्ट्र समिती तर्फे विधानसभा निवडणुकीत विजयी. (१९५७ - १९६२) या काळात आमदार
  १९७२-७५
किसान लिफ्ट इरिगेशन योजनेचे काम, नागठाणे येथे कोल्हापूर पध्दतीचा बंधारा, पारधी समाजाचे शिक्षण व पुनर्वसनासाठी प्रयत्न.
१९८१
सतत आठ वर्षाच्या अथक संघर्षानंतर २६ मार्चला हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याला मान्यता .
१९८४
हुतात्मा कारखा्न्याची अकरा महीन्यांच्या अल्पकालावधीत उभारणी, २९ जानेवारी १९८४ रोजी पहिला गळीत हंगाम .
१९८५
वाळवा मतदारसंघातून हुतात्मा चळवळीचे उमेदवार म्हणून विधानसभेवर विजयी
१९८५
ऐतवडे बूद्रक येथे शेतमजूर, कष्टकरी लोकांची भव्य परीषद. ५० हजार लोकांची उपस्थिती
१९८६
वारणा धरणग्रस्त संग्राम संघटणेची स्थापणा
१९८८
कोयना धरणग्रस्त संग्राम संघटणेची स्थापणा
१९८९
वाळवा येथे तिसरे अखिल भारतीय दलित-आदिवासी-ग्रामीण साहित्य संमेलन, सपत्नीक रशिया दौरा
  १९९१
साखर कारखाना कार्यक्षेत्र दुरुस्तीसाठी चळवळ
१९९३
बाबरी मशीद पाडणार्या जातीयवादी शक्तींचा विरोध म्हणून राष्ट्रीय एकात्मतेची वाळवा ते हुतात्मानगर (ता.शिराळा) अशी ८० किलोमीटरची मानवी साखळी. एक हजार सभा घेण्याला सुरुवात
१९९३
समान पाणीवाटप होऊन दुष्काळ कायमचा हटविण्याची मागणी घेऊन चळवळीला सुरुवात. आटपाडी तालुक्यांत भव्य पाणी परीषद. लातूर, किल्लारी, औंसा येथील भूकंपग्रस्तांना मदतीचा हात. १०८ मुले दत्तक घेऊन हुतात्मा साखर कारखान्यातर्फे पालन, पोषन व पदवीपर्यंत शिक्षणाची जबाबदारी.
१९९३
जुलै 1993 पासून सांगली,सातारा आणि सोलापुर जिल्हयातील 13 दुष्काळी तालुक्यांतील जनतेची व्यापक चळवळ उभी करुन प्रतिवर्षी राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त सलग 20 वर्षे पाणी परीषदेचे आयोजन. या पाणी संघर्ष चळवळीस यश येऊन टेंभूसारखी आशिया खंडातील सर्वात मोठ्या सिंचन योजनेचा जन्म होऊन ती कार्यान्वित करण्यात सरकारला भाग पडले.
१९९४
पुणे विद्यापीठाला राजर्षी शाहू महाराजांचे नांव देण्यासाठी चळवळीत पुढाकार. मुंबईत सचिवालयात मोर्चा
१९९५
आटपाडी तालुक्यात साराबंदी चळवळ, पाणी परीषद, क्रांतिकारक विद्यार्थी संघटणेची स्थापणा, शेतमजूर, कष्टकरी, शेतकरी स्त्री संघटणा परिषद स्थापन
१९९६
महाराष्ट्र राज्य धरणग्रस्त व प्रकल्पग्रस्त संग्राम संघटणेच्या अध्यक्षपदी निवड. दहा हजार लोकांचा मंत्रालयावर मोर्चा. कराड लोकसभा मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवली
१९९९
दुष्काळग्रस्त व धरणग्रस्तांचा शिवाजी पार्क ते आझाद मैदान असा १४ किलोमिटरचा मोर्चा
  २०००,फेब्रुवारी २६
द्वितीय विद्रोही साहित्य संमेलनाचे उदघाटक , संमेलनात सक्रिय सहभाग
२०००, मार्च २६
वाळवा येथे साखर कामगार, ऊस शेतकरी, धरणग्रस्त आणि दुष्काळग्रस्तांची भव्य परीषद, मे, जून, ऑगष्ट महिण्यांत १३ दुष्काळी तालुक्यांतील शेतकरी लोकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
२०००, डिसेंबर २०
वारणा अभयारण्यग्रस्तांचा वारणा धरणाच्या भिंतीवर ऐतिहासिक लढा, सरकारला उसनवार म्हणून पाणी भत्यापोटी हुतात्मा साखर कारखान्याकडून आठ लाख रुपये
२००१
माधवनगर कॉटण मिल कामगारांच्या लढ्यांत सहभाग
२००१
सहकारी साखर कारखान्यांवर लादलेल्या आयकराच्या विरोधासाठी केंद्रीय मंत्र्यांना सांगली, सातारा , कोल्हापूर जिल्ह्यांत जाहीर कार्यक्रमांना बंदी.
२००१, मे १४
क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी ऊर्फ क्रांतिवीरनगर नावाने उरमोडी धरणग्रस्त गावाचं नामकरण
२००४ मे
सागंली लोकसभा मतदारसंघातून १४ व्या लोकसभेची निवडणूक लढविली.
२००७,जुलै १५
श्री.जयवंत अहिर लिखीत अण्णांवरील चरित्र पुस्तकाचे माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे-पाटील यांच्या हस्ते प्रकाशन
२००८, फेब्रुवारी
हुतात्मा किसन अहिर यांच्या स्मृतिदिनी कारखाना कार्यस्थळावर हुतात्मा किसन अहिर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील यांच्या हस्ते अनावरण
२००९, फेब्रुवारी
हुतात्मा किसन अहिर विद्यालयाच्या प्रांगणात क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांचे राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते अनावरण, प्रमुख उपस्थिती केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारसो.
२०१०, जुलै
आटपाडी पाणी परीषद
२०११, मे २२
हुतात्मा बाबुराव विदयालय पडवळवाडी (ता.वाळवा) येथील विद्यालयाच्या भुमिपुजन कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती, सार्वजनिक क्षेत्रातील शेवटचा कार्यक्रम
२०१२, मार्च २२
लिलावती हॉस्फीटल मुंबई येथे निधन. लाखो जनसमुदायाचे उपस्थित वाळवा या जन्मभूमीत अंत्यसंस्कार
 
मुख्य पान     जीवनपट     व्हिडीऑ अल्बम     पुरस्कार     संपर्क